Wed, Feb 20, 2019 21:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खराब रस्तेप्रकरणी मुंबईतील ९६ अभियंत्यांवर  कारवाई 

खराब रस्तेप्रकरणी मुंबईतील ९६ अभियंत्यांवर  कारवाई 

Published On: Jan 07 2018 10:20AM | Last Updated: Jan 07 2018 10:03AM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

मुंबई माहापालिकेने रस्ते घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल आल्यावर दोशी अढळलेल्या ९६ अभियंत्यांवर कारवाई केली आहे. यातील चार अभियंत्याना निलंबीत केले आहे. तर ८१ अभियंत्याची पगारवाढ रोखली आहे. त्याचबरोबर ११ अभियंत्यांना १० हजाराचा दंड झाला आहे.

मुंबईतील रस्ता घोटाळा २०१५ मध्ये उजेडात आला होता. तत्कालीन महापौर स्नेहल अंबेकर यांनी संजय देशमुख यामच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या समितीने आपला प्राथमिक अहवाल सादर केला आहे. त्यात जवळपास सर्वच रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे असल्याचे म्हटले आहे.  जवळपास २०० रस्तांच्या दुरुस्तीचे बजेट १७०० कोटी पर्यंत गेले होते. या प्रकरणात जवळपास १७० अभियंत्यांची चौकशी सुरु आहे.