Thu, May 28, 2020 10:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेची गच्चीवरील पार्टी अडचणीत!

शिवसेनेची गच्चीवरील पार्टी अडचणीत!

Published On: Jan 06 2018 1:25AM | Last Updated: Jan 06 2018 1:16AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

पालिकेचे गच्चीवरील पार्टीचे धोरण म्हणजे, हॉटेलमध्ये आपल्या कुटुंबासमवेत जेवायला येणार्‍या मुंबईकरांच्या जिवाशी खेळण्यासारखे आहे, असा आरोप करत शुक्रवारी महापालिका सभागृहात काँग्रेस व भाजपाने पालिका प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी कमला मिलला लागलेल्या भीषण आगीला पालिका जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे शिवसेनेची गच्चीवरील पार्टी अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कमला मिलमधील वन अबव्ह पबला लागलेल्या आगीनंतर पालिकेतील नगरसेवक आक्रमक झाले आहेत. मुंबईत घडणार्‍या दुर्घटनेला पालिकेचे अधिकारी जबाबदार असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही. पण कमला मिलला लागलेल्या आगीत उच्चभ्रू वसाहतीमधील 14 जणांचा बळी गेल्यामुळे पालिकेने तातडीने पाच अधिकार्‍यांना निलंबित केले. याकडे लक्ष वेधण्याकरिता शुक्रवारी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी निवेदन सादर करून चर्चा घडवून आणली. साकीनाका येथे फरसाण दुकानाला लागलेल्या आगीचे प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही. पण कमला मिलला आग लागताच, त्यांनी तातडीने हॉटेलवर कारवाईच नाही तर अधिकार्‍यांनाही निलंबित केले. या दुजाभावाचा तीव्र शब्दांत आपण निषेध करत असल्याचे राजा यांनी सांगितले. कमला मिलमध्ये अनधिकृत बांधकामाला पाठीशी घालणारे अधिकारी आजही मोकाट आहेत. ज्यांना निलंबित केले त्यांची वर्षभरापूर्वी बदली झाली होती.