Sat, Feb 23, 2019 15:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जे.जे. पाठोपाठ सायन रुग्णालयातील डॉक्टर संपावर            

मुंबई : सायन रुग्णालयातील डॉक्टर संपावर

Published On: May 21 2018 1:26PM | Last Updated: May 21 2018 1:40PMमुंबई :  प्रतिनिधी   

मुंबईच्या जे.जे. रुग्णालयातील दोन ज्युनियर निवासी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मार्डच्या निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप सोमवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. शनिवारी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्याने डॉक्टरांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता जे. जे रूग्णालयातील निवासी डॉक्टरांपाठोपाठ सायन रूग्णालयातील निवासी डॉक्टरही  आजपासून संपावर गेले आहेत.  

सायन रूग्णालयातील सुमारे ४५० निवासी डॉक्टरांनी आज कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. केईएम आणि नायर रूग्णालयातील निवासी डॉक्टरही संपावर जाण्याची शक्यता आहे.  मागण्या मान्य होत नसल्याने मार्डने संपाचे हत्यार उपसले आहे. 

दरम्यान, गिरीश महाजन यांनी मार्डच्या डॉक्‍टरांना चर्चेसाठी बोलावले होते. काही वेळ संपकरी डॉक्‍टर आणि महाजन यांच्यामध्ये सकारात्‍मक चर्चा झाली. मात्र, मागण्यांची अंमलबजावणी झाल्‍याशिवाय संप मागे घेणार नसल्‍याची भूमिका डॉक्‍टरांनी घेतली आहे.