Sat, Mar 23, 2019 18:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत टॅक्‍सीचालकाकडून महिलेवर बलात्‍कार, दोघांना अटक

टॅक्‍सीचालकाकडून महिलेवर बलात्‍कार, दोघांना अटक

Published On: Dec 24 2017 8:15AM | Last Updated: Dec 24 2017 8:15AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मिरा-भाईंदरमधील काशिमिरा येथून ठाण्याला जाण्यासाठी निघालेल्या एका प्रवासी महिलेवर खासगी टॅक्‍सीचालकाकडून बलात्‍कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी टॅक्‍सीचालकासह आणखी एकाला काशिमिरा पोलिसांनी अटक केली आहे. २६ डिसेंबरपर्यत दोघांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 

यावेळी या दोघांनी पीडित महिलेकडील दागिने व काही रोख रक्‍कम काढून घेतली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर चालक सुरेश पांडुरंग गोसावी व उमेश जसवंत झा या दोघांना अटक करण्यात आली आहे.