Fri, Jul 19, 2019 14:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › समीर दिघे मुंबईच्या प्रशिक्षक पदावरून पायउतार

समीर दिघे मुंबईच्या प्रशिक्षक पदावरून पायउतार

Published On: Jun 08 2018 2:02PM | Last Updated: Jun 08 2018 2:02PMमुंबई : क्रीडा प्रतिनिधी

भारताचे माजी यष्टीरक्षक असलेले समीर दिघे यांनी वैयक्तिक कारणामुळे मुंबई क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे.अवघ्या एकाच हंगामात प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडल्यानंतर दिघे बाहेर पडल्याने आता नवीन हंगामापूर्वी मुंबईला नवीन प्रशिक्षक शोधावा लागणार आहे.

दिघे यांनी 2001-02 साली सहा कसोटी आणि 23 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी तो पुढे न वाढविण्याचा निर्णय घेतला.दिघे यांच्यासोबत एका वर्षाचा करार करण्यात आला होता.आम्ही त्याला वाढविण्याबाबत विचारले होते पण, कौटुंबिक कारणामुळे मला पुढे करार वाढवायचा नाही असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही आता नवीन प्रशिक्षकाची निवड करू असे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.

49 वर्षीय दिघे यांनी मुंबई संघाची सूत्रे चंद्रकांत पंडित याच्याकडून घेतली होती. दिघे यांच्या नेतृत्वाखाली 41 वेळा रणजी विजेत्या मुंबई संघाला उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.मुंबईच्या संघाने विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेच्या बाद फेरीत धडक मारली पण, जेतेपद मिळवण्यात त्याना यश आले नाही.