Wed, Jul 24, 2019 06:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईकरांना मरणयातना : मध्यरात्रीपर्यंत लोकल सुरळीत होण्याची शक्यता

मुंबईकरांना मरणयातना : मध्यरात्रीपर्यंत लोकल सुरळीत होण्याची शक्यता

Published On: Jul 03 2018 12:51PM | Last Updated: Jul 03 2018 10:08PMमुंबई : प्रतिनिधी

अंधेरी रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या उड्डाणपुलागतच्या पादचारी पुलाचा कोसळलेला मलबा उचलण्याचे काम उध्दपातळीवर सुरू आहे. सकाळी झालेल्या या दुर्घटनेनंतर पालिका, रेल्वे, अग्निशामक आणि पोलीस यंत्रणा यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून बचाव कार्य सुरू केले होते. 

मलबा हटविण्याच्या कामासाठी ६ क्रेन, ५ ते ६ जेसीबी, अग्निशामक दल, रेल्वे, आरपीएफ व अंधेरी पोलीस आणि २०० ते ३०० कामगार  युध्द पातळीवर काम करत आहेत. यामुळे रात्री १२ वाजेपर्यंत रेल्वे सेवा सुरळित होईल, अशी शक्यता उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

 रेल्वे स्टेशन व रूळावरील असलेला उड्डाणपुल आणि पादचारी पुल यांची दुरूस्ती करण्याचा अधिकार रेल्वे प्रशासन पालिकेला देत नाहीत. यामुळे मुंबईतील बहूसंख्य पुलाचे ऑडीट होत नाही. या दुर्घटनेला रेल्वे अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे स्थानिक आमदार रमेश लटके यांनी दैनिक पुढारीशी बोलताना केला.

रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लुट
अंधेरी येथील गोखलेपूला लगतचा पादचारी पुलाचा काही भाग कोसळताच मुंबईमधील रिक्षावाल्यांनी नेहमीप्रमाणे संधी साधली आहे. वेस्टर्न रेल्वे ठप्प झाल्याने चाकरमान्यांनी कसे ही करून ऑफिस गाठण्याची धावपळ केल्याने रिक्षावाल्यांनी सुद्धा हात धुवायला सुरुवात केल्याचे चित्र होते. प्रति प्रवाशामागे ऑटो रिक्षाने अंधेरी ते वांद्रा हे अंतर केवळ १५० रुपयात सहज गाठता येत, पण प्रवाशांची अडचण लक्षात येताच रिक्षावाल्यांनी शेअरिंग स्वरूपात प्रत्येक प्रवाशांकडून १०० रुपये घेतले. त्यामुळे जो प्रवास १५० रुपयांपर्यंत होतो त्याचसाठी आज रिक्षावाल्यांनी ३०० रुपयांची मागणी करत प्रवाशांची लूट केली. दुसरा पर्याय नसल्याने ऑफिसला लवकर पोहचण्याच्या आशेने प्रवाशांनी सुद्धा वाट्टेल ती किंमत मोजली. 

 

अपडेट : 

 

अपडेट : 

अंधेरी स्टेशनहुन अप आणि डाउन फास्ट लाइन संध्याकाळी 7 पर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न 


स्लो लाइन अप आणि डाउन रात्री 12 नंतर सुरू होईल 


अंधेरी - सीएसएमटी रेल्वे सुरू करण्यात आली आहे 


रेल्वे रूळावर पडलेला मलबा हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू 


 रात्री १२ वाजेपर्यंत रेल्वे सेवा सुरळीत होण्याची शक्यता
 

सायनच्या गांधी मार्केटमध्ये पाणीच पाणी
 

दादरच्या हिंदमाता, ओबेरॉय मॉल, कुर्ल्यात पाणी
 

मुंबईत रस्‍त्यावर पाणी साचल्याने रस्‍ते वाहतुकही विस्‍कळीत
 

दादरमधील हिंदमाता परिसरात रस्‍त्यावर पाणी साचले

मुसळधार पावसामुळे सायन स्‍टेशनवर रेल्‍वे रूळ पाण्याखाली