Fri, Sep 21, 2018 09:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राधेश्याम मोपलवार यांना क्लीन चिट

राधेश्याम मोपलवार यांना क्लीन चिट

Published On: Dec 02 2017 1:29AM | Last Updated: Dec 02 2017 1:15AM

बुकमार्क करा

मुंबई : खास प्रतिनिधी

राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना समृध्दी महामार्गाच्या जमीन खरेदी घोटाळ्याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे मोपलवार यांच्या हाती पुन्हा एकदा समृद्धी हायवेची सूत्रे येणार आहेत. 

मोपलवार यांचे एका दलालाशी जमीन खरेदीबाबत झालेेल्या बोलण्याची ऑडिओ क्लिप बाहेर आली होती. विजय मांगले या दलालाशी मोपलवार बोलत असल्याचे त्यातून दिसत होते. त्यानंतर मोपलवार यांच्यावर सेटलमेंटचा आरोप झाला होता, त्यात मुख्यमंत्री कार्यालयाचाही हात असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट 2017 मध्ये मोपलवार यांच्या या ऑडिओ क्लीपची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली होती. मोपलवार यांना पदावरून बाजूलाही केले. या समितीने चौकशी पूर्ण केली असून आपला अहवाल सादर केला आहे.