Thu, Feb 21, 2019 05:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेसखाली पाच म्हशी चिरडून ठार 

मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेसखाली पाच म्हशी चिरडून ठार 

Published On: Dec 01 2017 10:53AM | Last Updated: Dec 01 2017 10:53AM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेसखाली चार ते पाच म्हशी चिरडून ठार झाल्याने रेल्‍वे इंजिनमध्ये तांत्रीक बिघाड झाला. यामुळे कर्जतकडे जाणार्‍या व कर्जतकडून मुंबईकडे जाणार्‍या लोकल रद्द झाल्या. यामुळे अनेक चाकरमान्यांचे हाल झाले असून मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे लाइनवर वारंवार होणार्‍या अशा अपघातांबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी प्रवासीवगातून होत आहे. वाहतूक सुरळीत होण्याकरिता एक तास लागेल असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.