होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईः पोटनिवडणुकीत भाजपाच्या गिरकर विजयी

मुंबईः पोटनिवडणुकीत भाजपाच्या गिरकर विजयी

Published On: Dec 14 2017 1:45PM | Last Updated: Dec 14 2017 1:47PM

बुकमार्क करा

मुंबई  : प्रतिनिधी 

कांदिवली येथील प्रभाग क्रमांक २१ मध्ये झालेल्या पालिका पोटनिवडणुकीत भाजपाच्या प्रतिभा गिरकर विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसच्या निलम मधाने-मकवाणा यांचा पराभव केला. गिरकर यांना ९ हजार ५९१ तर मकवाना यांना १ हजार ९८४ मते मिळाली. 

भाजपाच्या नगरसेविका शैलजा गिरकर यांचे निधन झाल्यामुळे या प्रभागात पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला साथ दिल्यामुळे गिरकर यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. या निवडणुकीत 11 हजार 804 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात 229 मतदारांनी नोटा अंतर्गत मतदान केले.