Mon, Jun 17, 2019 15:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवस्‍मारकाच्या उंचीवरून केलेलं राजकारण दुर्देंवी : मुख्यमंत्री 

शिवस्‍मारकाच्या उंचीवरून केलेलं राजकारण दुर्देंवी : मुख्यमंत्री 

Published On: Jul 31 2018 6:47PM | Last Updated: Jul 31 2018 6:47PMमुंबई : प्रतिनिधी 

अरबी समुद्रातील शिवरायांचे स्‍मारक हे जगातील सर्वात उंच स्‍मारक असणार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केले. छत्रपती राजाराम महाराजांच्या जयंतीनिमित्‍त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राजाराम महाराजांच्या विचारांवर अधारित पुस्‍तकाचे प्रकाशन करण्यात आले.

या कार्यक्रमप्रसंगी बोलताना फडणवीस यांनी राजाराम महाराजांनी या देशाला आधुनिक भारताचा  मंत्र दिला आहे. उद्योगांचे जाळे, दळणवळण याबाबत महाराजांचे विचार प्रगत होते. परराज्‍यातले गुंतवणूकदार राज्‍यात यावेत, इतर ठिकाणचे उद्योग आपल्या राज्यात यावेत यासाठी त्यांनी विशेष प्रयत्‍न केले. व्यापारवृध्दीसाठी दळणवळणाचे महत्‍व त्याकाळी राजाराम महाराजांनी ओळखले होते. राजाराम महाराजांच्या दुरदृष्‍टीकोणातून कोल्‍हापुरात विमानतळाची निर्मिती केली असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि राजाराम महाराजांच्या विचारावरच सरकार मार्गक्रमण करत असल्‍याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

मराठा आरक्षणाचा कायदा आम्‍हीच केला....

मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाबींची पुर्तता राज्य सरकार करत आहे. आमचेच सरकार कायम स्वरूपी टिकणारे आरक्षण देईल असा विश्वास फडणवीस यांनी दिला. छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला पहिल्‍यांदा आरक्षण दिले होते. आमचे सरकार सत्तेत आल्‍यावर सभागृहात सर्वप्रथम मराठा आरक्षणाचा कायदा केल्‍याचे सांगितले. मराठा आरक्षणाला लवकर आराक्षण मिळावे यासाठी मागासवर्ग आयोगाला लवकर अहवाल देण्याची विनंती करण्यात आली आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्‍दा लवकर निकालात निघेल असा विश्वास व्‍यक्‍त केला.