Tue, Apr 23, 2019 09:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘घर से निकलते ही...’पोलिसांनी फाडली पावती

‘घर से निकलते ही...’पोलिसांनी फाडली पावती

Published On: May 17 2018 2:10PM | Last Updated: May 17 2018 3:09PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काय भरोसा नाही. सोशल मीडियावर एखादा नवा ट्रेंड सुरू झाल्यावर त्यावर प्रतिक्रीया म्हणून प्रत्येकाच्या वॉलवर ते फोटो, मेसेज आणि हॅशटॅग व्हायरल होत असतात. या ट्रेंडचा पोलिसही शिताफीने वापर करून घेत असल्याचे चित्र नुकतेच पाहायला मिळाले. यावेळी मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या फोटोवरून नवा ट्रेंड सुरू झाला आहे. 

‘घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही’ असे या ट्रेंडचे नाव आहे. उदित नारायण यांनी म्हटलेल्या गाण्याचा अरमान मलिक यांनी रिमेक केला आहे. याच गाण्यावर आधारीत ‘तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा काय असता आणि काही दूर अंतरावर गेल्यावर तुमची काय स्थिती होते, असे कॉमेडी फोटो या ट्रेंडमध्ये  व्हायरल केले जात आहेत. 

एक मुलगा हेल्मेट न घालता घरातून निघतो आणि पुढे जाऊन त्याला ट्रॅफिक पोलिस अडवतात आणि पावती फाडतात. म्हणजेच, ‘घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही’ या ओळींसोबत हा फोटो शेअर केला गेला आहे. मुंबई पोलिसांच्या या मजेदार ट्विटला १३ हजार पेक्षाही जास्त लोकांनी रिट्विट केले आहे. वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिस अनेक फंडे आजमावत असतात. पण, आता पोलिसांनी आजमावलेला हा फंडा लोकप्रिय झाला आहे. 

मुंबई पुलिस ने ली चुटकी...

मुंबई पोलिसांची ही पोस्ट कॉपी करून अनेकांनी फोटो व्हायरल केले आहेत. यात काही मजेदार फोटोही आहेत. 
 

विजय राज की ऐक्टिंग...