Thu, Jul 18, 2019 15:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जिग्नेश मेवानीच्या सभेला परवानगी नाकारली

जिग्नेश मेवानीच्या सभेला परवानगी नाकारली

Published On: Jan 04 2018 10:45AM | Last Updated: Jan 04 2018 2:39PM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

छात्र भारतीच्या वतीने आयोजित राष्ट्रीय छात्र सभेला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. या सभेत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी आणि जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिद यांचे भाषण होणार होते. मात्र, परवानगी नाकारली असली तरीही आम्‍ही सभा घेणारच अशी भूमिका संयोजकांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी विले पार्ले येथे जमावबंदी आदेश लागू केला आहे. तसेच गोंधळ करणाऱ्या छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. 

वाचा दंगलीत तेल नको पाणी ओता; शिवसेनेचा आंबेडकरांना सल्ला

दरम्यान, आमदार कपिल पाटील यांच्यासह छात्र भारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे,  छात्र भारती आयोजित राष्ट्रीय छात्र सम्मेलनाचे निमंत्रक सागर भालेराव, मुंबई छात्र भारतीचे अध्यक्ष सचिन बनसोडे, रोहित ढाले यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

वाचा : viral : कोणाचं काय तर कोणाचं काय

भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषधार्थ बुधवारी महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला ठिकठिकाणी हिंसक वळण लागल्यानंतर काल, जिग्नेश मेवानीची वरळीतील जाहीर सभा रद्द करण्यात आली होती. राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन संयोजकांनी हा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज, छात्र भारतीने विलेपार्ले येथील भाईदास सभागृहात जिग्नेश मेवानी आणि उमर खालीद यांच्या सभेचे आयोजन केले होते. मात्र, पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. मात्र, परवानगी नाकारली असली तरीही आम्‍ही सभा घेणारच अशी सभेच्या पदाधिकाऱ्यांनी भूमिका घेतली आहे. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी  विलेपार्ले परिसरात जमावबदी लागू केली आहे. तसेच गोंधळ घालणाऱ्या छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे. 

वाचा : जे झालं ते झालं आता शांतता राखा : शरद पवार

विलेपार्ले परिसरातील तणावाची  परिस्थिती लक्षात घेवून घटनास्‍थळी पालिसांची जादा कुमक मागवण्यात आली आहे. त्‍यामुळे भाईदास सभागृहाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भाईदास सभागृहात होणाऱ्या सभेसाठी जिग्नेश मेवानी, उमर खालिद यांच्यासह रिचा सिंग, प्रदीप नरवाल येणार असल्याचे छात्र भारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे यांनी सांगितले.

वाचा : महाराष्‍ट्रातील हिंसाचारामागे षड्‍यंत्र : संजय राऊत