Thu, Sep 20, 2018 01:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील दम् मारो दम् थांबणार?

मुंबईतील दम् मारो दम् थांबणार?

Published On: Dec 27 2017 4:54PM | Last Updated: Dec 27 2017 4:54PM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

गोरेगाव येथील हुक्का पार्लरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या खुनाची घटना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी गांभीर्याने घेतली आहे. या घटनेनंतर शहरातील हुक्का पार्लरवर कारवाई करावी, अशी मागणी महापौर महाडेश्वर यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे. मुंबई पोलिसांनी हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आश्वासन महापौरांना दिले आहे. त्यामुळे भविष्यात मुंबईतील दम् मारो दम् बंद होण्याची शक्यता आहे. 

मुंबईतील हुक्का पार्लरवर कारवाई करण्यासंदर्भात, बुधवारी महापौर विश्र्वनाथ महाडेश्र्वर यांनी मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची भेट घेतली. या वेळी महापौरांनी गोरेगाव येथील हुक्का पार्लरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या खुनाकडे आयुक्तांचे लक्ष वेधले. पालिका व पोलिस यांच्या समन्वयातून सर्व हुक्का पार्लरवर बंदी घालणे गरजेचे झाले आहे, असे मत महापौरांनी व्यक्त केले. याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत. हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.