होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुत्र्यांच्या झुंजीतून वाचवून हरणाला दिले जीवदान

कुत्र्यांच्या झुंजीतून वाचवून हरणाला दिले जीवदान

Published On: May 09 2018 1:08PM | Last Updated: May 09 2018 1:08PMनवी मुंबई: राजेंद्र पाटील 

माणुसकी लोप पावत चालली असताना खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात काही लोकांनी आदर्श घालून दिला. काही लोकांनी हरणाला कुत्र्यापासून वाचवून जीवदान दिले. काल (८ मे) रात्रीच्या सुमारास विकास कॉलनी परीसरात एक हरीण कुत्र्यांशी झुंज देत होते. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या हरणाची कुत्र्यापासून सुटका केली. हरणावर औषध उपचार करून वनाधिकारींच्या ताब्यात दिले. 

या बाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील विकास कॉलनी भागातून सुसाट वेगाने एक हरीण छत्रपती संभाजी महाराज चौकाकडे येत होते. त्या दरम्यान काही कुत्र्यांशी या हरणाची झुंज सुरू झाली. विकास कॉलनीतील रहिवासी विष्णू पाटील हरणाला कुत्र्यापासून सोडवत होते. याचवेळी पोलिस कॉन्स्टेबल दिपक पाटील यांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांनी हरणाला पकडले. हरीण तेव्हा जखमी अवस्थेत होते.

हा प्रकार समजल्यावर कॉग्रेसचे जिल्हा आरोग्य सेवा सेल अध्यक्ष सचिन सोमवंशी तात्काळ घटनास्थळी आले. त्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यातील संजु पाटील यांना बोलावून औषध उपचार करवून घेतले. यावेळी पोलिस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषद चे सेवानिवृत्त अधिकारी पी. एस पाटील, होमगार्ड रोहीदास पाटील,अरूण पाटील, अमोल पाटील, यांच्यासह आदी उपस्थित होते. 

जखमी हरणावर उपचार करुन पोलिसांच्या उपस्थितीत वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर देसाई यांच्या हवाली करण्यात आले. आता हरणाची तब्येत ठणठणीत असून त्याला काल (८ मे) रात्रीच वनविभागाच्या लाख तांडा जंगलात असलेल्या नर्सरी मध्ये ठेवण्यात आले आहे.