Fri, Nov 16, 2018 17:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एकाच कुटुंबातील चौघांची आत्‍महत्‍या 

एकाच कुटुंबातील चौघांची आत्‍महत्‍या 

Published On: Jun 23 2018 4:54PM | Last Updated: Jun 23 2018 4:54PMमुंबई 

कफपरेड येथील एकाचं कुटुंबातील तीघांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, बांद्रा शासकीय वसाहतीत राहात असलेल्या एकाच कुटुंबातील चौघानी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी उघड़कीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांद्रा पूर्व मुंबईतील बिल्डिंग नं 2 मधील रूम नं. 210 मध्ये शासकीय वसाहत, या ठिकाणी भिंगारे कुटुंबिय राहातात. दि. 23/ 06 /२०18 रोजी  1 वाजण्याच्या सुमारास राहत्‍या घरी राजेश तुळशीराम भिंगारे (वय 45 वर्षें), पत्नी अश्विनी, मुलगा तुषार (वय 23 वर्षे) व गौरांग (वय 19 वर्षे) यांनी झुरळ मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या केली. त्यांना सायन हॉस्पिटल येथे उपचारांसाठी नेले असाता डॉक्टरांनी तपासून दाखलपूर्व मयत घोषित केले. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.