Thu, Apr 25, 2019 05:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता बाईक आणि कार चोरीला बसणार आळा

आता बाईक आणि कार चोरीला बसणार आळा

Published On: Dec 30 2017 1:47AM | Last Updated: Dec 30 2017 12:53AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

मुंबईत रस्त्यावर उभी केलेली वाहने अनेकदा चोरी झाल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत. मात्र आता आता बाईक आणि कार यांच्या चोरीला आळा बसणाार आहे. त्यासाठी मात्र एक खास नव्याने लॉन्च झाले डिव्हाईस ज्याला रियल टाईम मिनी ट्रॅकींग डिव्हाईस म्हणतात. हे डिव्हाईस कार, बाईक, बॅग किंवा इतर कोणत्याही गोष्टीसोबत कनेक्ट करणे गरजेचे आहे. ते त्या वस्तूचे रियल टाईम पोजिशन दर्शवते. सिक्योमोर नावाचे हे डिव्हाईस सध्या ऑनलाईन बुक करता येते.

या डिव्हाईसचे वैशिष्ट्ये म्हणजे हे डिव्हाईस इंटरनेटशिवाय काम करते. त्यामुळे याचा वापर कुठेही करता येणे शक्य होणार आहे. त्यासाठी या डिव्हाईसमध्ये एक नॅनो सिम इन्सर्ट करावे लागणार आहे. अ‍ॅपच्या मदतीने डिव्हाईस ट्रॅक करणे शक्य होणार आहे. हे डिव्हाईस 2ॠ ॠडच/ॠझठड/ॠझड, ढउझ/खझ  नेटवर्कवर काम करेल. यात रिचार्जेबल बॅटरी असून ज्याचे बॅकअ‍ॅप सुमारे 3 दिवस असणार आहे. हे वॉटरप्रुफ असून मायक्रोफोन आहे. म्हणजे हे डिव्हाईस जिथे कुठे असेल तिथल्या गोष्टी, आवाज तुम्हाला ऐकू येईल. त्याचबरोबर डिव्हाईसला एसएमएसच्या मदतीने ही नियंत्रित करता येणे शक्य होणार आहे.