Mon, Jun 24, 2019 21:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कार अपघातात दोन जण गंभीर जखमी

कार अपघातात दोन जण गंभीर जखमी

Published On: Mar 16 2018 1:50AM | Last Updated: Mar 16 2018 1:50AMनवी मुंबई: प्रतिनिधी 

पामबीच मार्गे बेलापूरकडून वाशीकडे जाताना करावे गावालगत भरधाव वेगाने आलेल्या कारचा ( एमएच 43 बीजे 5341 ) अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार पामबीच दुभाजकाच्यामध्ये जाऊन २० फुट फरफटत पोलवर जाऊन आदळली. अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. दोघांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. शुक्रवारी रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कारमधील सर्वजण विलेपार्ले येथील रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कारचा वेग एवढा होता की दुभाजकाच्या मध्यभागी असलेले पामट्री उखडून कारने विद्युत पोलला धडक दिली. दुभाजकाच्या मध्यभागी असलेली शोभेची झाडे तोडून कार विरूद्ध बाजूला लावलेला पत्रा ओढत नेला. कारमध्ये सहा जण असल्याची माहिती आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर वाहन चालकांची गर्दी झाली होती. मार्च महिन्यातील हा या मार्गावर झालेला दुसरा अपघात आहे.