होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुलुंड चेक नाका जाम

मुलुंड चेक नाका जाम

Published On: Aug 04 2018 1:56PM | Last Updated: Aug 04 2018 1:56PMमुंबई - प्रतिनिधी

मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या लालबहादुर शास्त्री मार्गावरील मुलुंड चेक नाक्यावर शनिवारी दुपारी वाहनांची प्रचंड मोठ्या प्रमाणात कोंडी पाहायला मिळाली. ठाण्यातील प्रवेशद्वारापासून ते मुलुंडच्या वैशालीनगर सिग्नलपर्यंत, तर मुंलुंड रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणारा डाम्पिंग रोड, पाच रास्ता जंक्शन पर्यंत जाम झाला होता. शुक्रवारीसुद्धा अशाप्रकारेच दुपारी वाहतूक कोंडी झाल्याने काही रिक्षा चालकांनी तीन तास रिक्षा बंद ठेवल्याचे सांगितले.