Tue, Mar 26, 2019 07:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोडकसागर तलाव वाहू लागला !

मोडकसागर तलाव वाहू लागला !

Published On: Jul 15 2018 7:46PM | Last Updated: Jul 15 2018 7:46PMमुंबई  : प्रतिनिधी 

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्‍या महत्वाच्या तलावापैकी ठाणे जिल्ह्यातील मोडक सागर तलाव आज रविवारी दुपारी 3 वाजून 5 मिनीटांनी ओसंडून वाहू लागला. या तलावातून मुंबईला दररोज 450 दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होतो.

मुंबईसह शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या महिन्यापासून समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे तलावातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईतील नॅशनल पार्क येथील तुळसी तलावाच्या पाठोपाठ आता मोडक सागर तलाव रविवारी ओसंडून वाहू लागला. या तलावातील पाणी भांडूप संकूल येथील जलशुध्दीकरण केंद्रात शुध्द करून त्याचा पुरवठा शहराला केला जातो. या तलावातून दररोज तब्बल 450 दशलक्ष लिटर्स पाणी उचलण्यात येत असून हे राज्यातील अनेक छोट्या शहराना दररोज पुरवठा होणार्‍या पाण्यापेक्षा जास्त आहे.