Sat, Jan 19, 2019 07:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विचारधारेवर बोलू नका : चंद्रकांत पाटील; विधानपरिषदेत गोंधळ

विचारधारेवर बोलू नका : चंद्रकांत पाटील; विधानपरिषदेत गोंधळ

Published On: Mar 05 2018 4:02PM | Last Updated: Mar 05 2018 4:02PMमुबंई : प्रतिनिधी

देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांचा अवमान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांच निलंबन मागे घेण्याचा मुद्या विशिष्ट विचारधारेशी जोडत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी विधानपरिषदेत केला. कारण नसताना हा विषय विचारधारेशी जोडू नका अशा शब्दांत सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यांना सुनावत आक्रमक भूमिका घेतली. यामुळे उडालेल्या गोंधळामुळे सुरूवातीला दहा मिनिटे आणि त्यानंतर दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

शिवसेना गटनेते ॲड. अनिल परब यांनी परिचारक यांनी केलेलं वक्तव्य हे देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांचा अपमान करणारे आहे. त्यामुळे त्यांच निलंबन मागे घेतल तर सभागृहाला शहीदांचा अपमान मान्य आहे असा समज होईल. कायद्यापेक्षा भावना महत्वाची असल्याचे सांगत हा विषय नियम व कायद्याच्या कचाट्यात अडकवू नका. तर यासंदर्भात प्रथा आणि परंपरेनुसार निर्णय करून परिचारक यांना बडतर्फ करा अशी मागणी त्यांनी केली. नीलम गोऱ्हे यांनी त्यास पाठिंबा दिला.  

कपिल पाटील यांनी ही यावेळी बोलताना परिचारकांना पुन्हा बोलावून घातक परंपरा सुरू होईल, असे सांगत शिवसेना सदस्य परब यांनी मांडलेल्या बडतर्फीच्या प्रस्तावास पाठिंबा दिला. त्यावर बोलताना सभागृहाच्या  प्रथा आणि परंपरेला छेद देणाऱ्या एक विशिष्ट विचारधारेचे लोक इथे बसलेले आहेत. परिचारकांचं निलंबन मागे घेण्याचा ठराव त्याच मानसिकतेतून मांडण्यात आल्याचे सांगत सत्ताधरी पक्षाच्या भूमिकेवर जोरदार हल्ला चढवला. यामुळे संतप्त झालेल्या चंद्रकांत पाटील यांनी वारंवार विचारधारेवर बोलू नका, कोणत्याही विषयाचा संबंध त्याच्याशी जोडू नका, असे कपिल पाटील यांना बजावले.­