Sat, Mar 23, 2019 00:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : मिलिंद वैद्य, परमेश्वर कदम स्थायी समितीवर

मुंबई : मिलिंद वैद्य, परमेश्वर कदम स्थायी समितीवर

Published On: Feb 16 2018 4:52PM | Last Updated: Feb 16 2018 6:16PMमुंबई : प्रतिनिधी 

शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकांचा स्थायी समितीचा राजीनामा घेऊन, अवघ्या 24 तासातच माहिमचे नगरसेवक माजी महापौर मिलिंद वैद्य व मनसेतून शिवसेनेत आलेले घाटकोपरचे नगरसेवक यांची स्थायी समिती सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीसाठी थेट मातोश्रीवरून आदेश निघाल्याचे बोलले जात आहे.

महापौर व स्थायी समितीचे दावेदार असलेल्या सातमकर व चेंबूरकर यांना मुळ प्रवाहातून दूर करण्यात आले. हे दोन्ही नगरसेवक मातोश्रीच्या वरचढ ठरत असल्यामुळे एका वरिष्ठ नेत्याच्या आग्रहाखातर या दोघांना हटवण्यात आले. या दोघांच्या रिक्त जागेवर मातोश्रीच्या खास मर्जीतील मिलिंद वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली. तर शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपाने टार्गेट केलेल्या परमेश्वर कदम यांना मुळ प्रवाहात आणले. या दोघांच्या नियुक्तीची शुक्रवारी महापालिका सभागृहात महापौर विश्र्वनाथ महाडेश्र्वर यांनी घोषणा केली.