Tue, Apr 23, 2019 18:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : होर्डिंगवर चढून मनोरुग्ण महिलेचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न (video)

मुंबई :होर्डिंगवर चढून मनोरुग्ण महिलेचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न (video)

Published On: Feb 15 2018 4:13PM | Last Updated: Feb 15 2018 4:20PMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील चर्नीरोड स्टेशनबाहेर असलेल्‍या होर्डिंग्जवरील लोखंडी फ्रेमवर एक मनोरुग्ण महिलेने चढून आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला. सपना परेरा वय वर्ष (50) असे या महिलेचे नाव असून, या आधीही या महिलेने अशा प्रकारचा प्रयत्‍न केला असल्‍याचे समोर आले आहे. या ठिकाणी पोलिस आणि अग्‍नीशामक दलाने घटनास्‍थळी दाखल होत तब्‍बल दीड तासाच्या अथक प्रयत्‍नानंतर या महिलेला सुखरूप खाली उतरवले. 

चर्नीरोडवरीन रेल्‍वे स्‍टेशन परिसरात असलेल्‍या एका उंच होर्डींगवर एक महिला चढली होती. सुरूवातीला या महिलेबद्दल फारशी माहिती नव्हती. मात्र नंतर ही महिला  मनोरुग्णया असल्‍याचे समजले. लोखंडी होर्डींगवर चढून या महिलेन गळफास लावण्याचा प्रयत्‍न केल्‍याने काहीवेळ वातावरण तणावपुर्ण बनले होते.   हा प्रकार तासाभर सुरू होता. या महिलेला खाली येण्यासाठी सर्वांनी विनंती केली. मात्र ती खाली येत  नसल्‍याने पोलिसांना पाचारन करण्यात आले. अखेर पोलिस आणि अग्‍नीशमन दलाच्या प्रयत्‍नाने या महिलेला खाली उतरवण्यात यश आले आल्‍याने सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला आहे.