होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माटुंगा पश्चिमेकडील पादचारी पुलाला तडे 

माटुंगा पश्चिमेकडील पादचारी पुलाला तडे 

Published On: Jul 18 2018 3:11PM | Last Updated: Jul 18 2018 3:11PMमुंबई : प्रतिनिधी

अंधेरी येथील पादचारी पूल कोसळून पंधरा दिवस झाले नाहीत. तोच मुंबईतील आणखी काही पुलाची दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. बुधवारी सकाळी माटुंगा पश्चिमेकडील पुलाला तडे गेले आहेत. यामुळे हा पूल बुधवारी सकाळपासून बंद ठेवण्यात आला आहे.

माटुंगा पश्चिमेला माटुंगा रेल्वे स्थानकाशी जोडणाऱ्या पादचारी पुलाला तडे गेल्याचे समोर आले. याप्रकरणी स्थानिकांनी महापालिकेकडे तक्रारदेखील केली. अखेर महापालिकेने या तक्रारींची दखल घेत सुरक्षेच्या कारणास्तव हा पूल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. पुलाचे दुरुस्ती काम केल्यानंतरच तो पादचाऱ्यांसाठी पुन्हा खुला केला जाईल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.