होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'अभिभाषण' प्रकरणी कारवाई करा : राज्यपाल

'अभिभाषण' प्रकरणी कारवाई करा : राज्यपाल

Published On: Feb 26 2018 4:51PM | Last Updated: Feb 26 2018 4:58PMमुबंई : प्रतिनिधी

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या मराठी अनुवादासंदर्भात घडलेल्या प्रकारची गंभीर दखल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी घेतली आहे. या गोंधळाची चौकशी करून जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा असे निर्देश त्‍यांनी दिले आहेत.

राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना तातडीने पत्र पाठवले. 

विधानमंडळात झालेल्या राज्यपालांच्या अभिभाषणावेळी मराठी अनुवाद वाचनाची व्यवस्था न झाल्याबद्दल तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. या गोष्टीची अत्यंत गांभीर्याने दखल घेत चुकीसाठी जबाबदार व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी सूचना राज्यपालांनी आपल्या पत्रामध्ये केली आहे. 

संबंधित बातम्याः

राज्य सरकारला मराठीचे वावडे; गुजरातीचा पुळका

राज्यपालांचं अभिभाषण गुजरातीत; तावडे अनुवादक