Sun, Apr 21, 2019 13:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राणीबागेत अवतरणार विविध जलचर 

राणीबागेत अवतरणार विविध जलचर 

Published On: Feb 07 2018 4:39PM | Last Updated: Feb 07 2018 4:39PMमुंबई  : प्रतिनिधी 

मुंबईतील अरबी समुद्रात 'डॉल्फिन' दिसणे तसे दुर्मीळच.. स्टारफिश, ऑक्टोपस, कासव यासारखे जलचर बघायचे झाले तर आपल्याला मत्स्यालयात जावे लागते. मात्र हे जलचर प्राणी आता चक्क राणीबागेत अवतरणार आहेत. 

महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय (राणीबाग) येथे ९ ते ११ फेब्रुवारी रोजी वार्षिक उद्यान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.या प्रदर्शनात डॉल्फिन, स्टारफिश, ऑक्टोपस, कासव, बदक,मगर, खेकडा, ऍनाकोंडा, इत्यादींच्या फुलांपासून तयार केलेल्या प्रतिकृती ठेवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या प्रतिकृती ठेवण्यासाठी सुमारे १०० मीटर लांबीची एक कृत्रिम नदी  तयार करण्यात आली आहे. इतकेच नाही तर, या नदीमध्ये  फुलांनी जवलेला'शिकारा' देखील असणार आहे. या विविध जलचरांच्या प्रतिकृती आणि कृत्रिम नदी साकारण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागातील ४० कामगार, कर्मचारी आणि अधिकारी गेले तीन महिने दिवस रात्र मेहनत घेत आहेत, असे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. त्‍यामुळ पाण्यातील जलचर फुलांच्या स्‍वरूपात पाहण्याची संधी मुंबईकरांना उपलब्‍ध होणार आहे.