Wed, Sep 19, 2018 18:21



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कमला मिल आग:  पब मालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा

कमला मिल आग:  पब मालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा

Published On: Dec 29 2017 11:07AM | Last Updated: Dec 29 2017 11:20AM

बुकमार्क करा




मुंबईः पुढारी ऑनलाईन

परळ परिसरातील कमला मिलमधील ट्रेड हाऊस इमारतीला लागलेल्‍या भीषण आगप्रकरणी पब मालकांवर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. या प्रकरणी मालक अभिजीत मानकर, हितेश संघवी आणि जिगर संघवी याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्रत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्तांना या घटनेबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

कमला मिल कंपाऊंडमधील 'वन-अबव्ह' पब आणि 'हॉटेल मोजोस ब्रिस्टोल'ला पार्टी सुरू असताना गुरुवारी रात्री साडेबारा वाजता आग लागली होती. या दुर्देवी घटनेत १५ जण ठार तर, १२ जण जखमी झाले आहेत. आगीत जखमी झालेल्‍यांवर केईएम आणि सायन रूग्‍णालयात उपचार सुरु आहेत. सायन रुग्‍णालयातील जखमींची प्रकृती चिंताजणक आहे. तर, आगीम मृत पावलेल्‍या व्यक्‍तिंचा गुदमरल्‍याने मृत्‍यू झाल्‍याचे डॉ. राजेश देरे यांनी दिलेल्‍या  शवविश्चेदन अहवालामध्ये म्‍हटले आहे.

इमारतीच्या टेरेसवर मोजोस पब आहे. या पबमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. परिसरात रेस्टॉरेंट्स आणि पब आहेत. टेरेसवर बांधण्यात आलेलं बांबू आणि प्लास्टिकचं संपूर्ण छप्पर जळून खाक झालं.

या आगीत प्रमिला, तेजल गांधी (वय वर्षे ३६), खुशबू बन्सल, विश्वा ललानी (वय वर्षे २३), पारुल लकडावाला (वय वर्षे ४९), धैर्य ललानी (वय वर्षे २६), किंजल शहा (वय वर्षे २१), कविता धरानी (वय वर्षे ३६), शेफाली जोशी, यशा ठक्कर (वय वर्षे २२), सरबजीत परेला, प्राची खेतानी (वय वर्षे ३०), मनिषा शहा (वय वर्षे ४७), प्रीती राजगीरा (वय वर्षे ४१) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.