Sun, Jul 21, 2019 01:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दगडफेकीमुळे लाठीचार्ज करावा लागला : मुख्यमंत्री

दगडफेकीमुळे लाठीचार्ज करावा लागला : मुख्यमंत्री

Published On: Mar 20 2018 12:45PM | Last Updated: Mar 20 2018 12:45PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

विद्यार्थ्यांनी रेल्‍वेवर दगडफेक केल्‍यामुळेच पोलिसांनी त्‍यांच्यावर लाठीचार्च केल्‍याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले. रेल्वे भरतीतमध्ये झालेल्‍या गोंधळामुळे अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आज(दि. २० मार्च) मांटुंगा ते दादर रेल्‍वे मार्गावर रेल्‍वे आडवत आंदोलन केले. आंदोलनाला दोन ते तीन तास झाले तरी या आंदोलकांची रेल्‍वे प्रशासनाकडून कोणत्‍याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. त्‍यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले. यावेळी विद्यार्थ्यांना रेल्‍वे रुळावरून हटविण्यासाठी पोलिसांनी सौम्‍य लाठीमार केला. पोलिसांच्या या कृतीवर सर्वच स्‍तरातून जोरदार टीका होत आहे. याच विषयावरून आज विधानसभा सुरु होताच विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्‍तर दिले. 

वाचा संबंधित बातम्‍या : विद्यार्थ्यांनी माटुंगा रेल्‍वे अडवली, वाहतूक विस्‍कळीत(व्हिडिओ)

                               : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सरकारचे अपयश समोर : मुंडे 

                               आंदोलन मुंबईमध्ये, झळ बदलापूरला

गेल्‍या पाच वर्षांपासून रेल्‍वेत कोणत्‍याही प्रकारची भरती करण्यात आली नाही. त्‍यामुळे अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत  दादर-माटुंग्या दरम्यान रेल रोको केला होता. या आंदोलनावरून आज सकाळी विधानसभा सुरु झाल्यानंतर रेल्वेरोकोवरुन विरोधकांनी सभागृहात गोंधळ केला. आंदोलनकर्त्यांवर करण्यात आलेल्या लाठी चार्जवरुन विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला. यावरुन सत्ताधारी भाजपाला प्रश्न विचारण्यात आले. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: उत्तर दिले. 

मुख्यमंत्री म्हणाले, अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी सकाळी केलेल्या आंदोलनामुळे सीएसटीच्या दिशेने जाणारी आणि येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. आंदोलन कर्त्यांनी लोकलवर दगडफेक केल्यामुळे त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला होता. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

‘‘सध्या रेल्वे आणि अंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा सूरु आहे. त्यांना नोकरीत घ्यावं अशी मागणी करण्यात येत आहे.  शंभर टक्‍के अॅप्रेंटिस लोकांना नोकरी द्यावी अशी त्यांची मागणी आहे. पण तसे केल्यास अन्य शिक्षित तरुणांवर अन्याय होईल त्यामुळे त्यांच्यासाठी वीस टक्‍के जागा राखीव ठेवल्या आहेत. लवकरच यावर योग्य तो तोडगा निघेल.’’ असे मुख्यमंत्री म्‍हणाले. 

Tags : cm devendra fadnvis, Assembly, mumbai local train status rail roko, matunga students