Wed, Jan 29, 2020 22:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धुक्यामुळे लोकल पंधरा मिनिटे उशिरा

धुक्यामुळे लोकल पंधरा मिनिटे उशिरा

Published On: Dec 07 2017 9:50AM | Last Updated: Dec 07 2017 9:49AM

बुकमार्क करा

ठाणे : अमोल कदम

बुधवार संध्याकाळचा दिवस प्रवाशांचा मालगाडी घसरल्यामुळे खोलब्यांत गेला. तर, गुरुवार सकाळी सर्वत्र पसरलेल्या धुक्यामुळे मध्य रेल्वेचे लोकलचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले आणि पंधरा मिनिटे उशिरा लोकल ठाण्याच्या पुढे अप-डाऊन मार्गावर कल्याण, डोंबिवली दरम्यान धावू लागली आहे. तर, पश्चिम आणि हार्बर मार्गावर दहा मिनिटे लोकल उशिरा धावत होती.

सोमवारी ओखी वादळामुळे सर्वत्र पाऊस पडत होता. ओखी वादळ राज्याचा मार्ग बदलून गुजरातच्या दिशेने गेल्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर जिल्यासह सर्व कोकण किनारपट्टीने सुटकेचा श्वास घेतला. पण मंगळवारी आणि बुधवारी सकाळ पासून दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्याचा परिणाम गुरुवारी सकाळीच सर्वत्र मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गावर पडलेल्या धुक्यामुळे रेल्वे प्रवाशांना जाणवला. त्यामुळे पुन्हा मध्य रेल्वे लोकलचे वेळापत्रक नियमित वेळेच्या पंधरा मिनिटे कोलमडून लोकल उशिरा धावू लागली. गुरुवारी सकाळीच प्रवाशांना लोकल उशीरा मिळत असल्यामुळे गर्दीचा त्रास सहन करत पुढील स्थानक गाठावे लागले.  काही प्रवाशांनी लोकलच्या गर्दीला कंटाळून बसने प्रवास करणेच सोयीचे  असल्‍याचे सांगितले.