Mon, Apr 22, 2019 03:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › थर्टी फर्स्टवर लाफिंग गॅस ड्रग्जचे सावटस

थर्टी फस्टला 'लाफिंग गॅस'पासून सावध रहा!

Published On: Dec 23 2017 2:32AM | Last Updated: Dec 23 2017 2:32AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

सरत्या वर्षाला निरोप देताना व नववर्ष 2018 च्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असताना, मुंबईतील नशेच्या सौदागरांनीही आपले हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. यावेळी माहौल आणखी नशिला बनवण्यासाठी त्यांनी एक नवा अंमलीपदार्थ आणल्याची सूत्रांची माहिती आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करणार्‍या पार्ट्यांमध्ये लाफिंग गॅस नावाचा हा अंमली पदार्थ विकला जात आहे. 

लंडन आणि संपूर्ण युनायटेड किंगडममध्ये धुमाकूळ घालणारा लाफिंग गॅस आता मुंबईतल्या पार्ट्यांमध्येही पसरणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित पार्ट्यांमध्ये वापरासाठी तो विकला जात आहे. ही नशा करणारी व्यक्ती अचानक हसू लागते. नायट्रस ऑक्साइड रंगहीन अशा या पदार्थाची चव थोडी गोड असते.या पदार्थाचा अंमल थोड्या तासांसाठी राहतो. ही नशा करणारी व्यक्ती अचानक हसू लागते. त्यामुळंच तरूणाईमध्ये या ड्रग्जची खास क्रेझ आहे. 

न्यू इयर पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांचा सर्वाधिक खप होतो ,त्यामुळेच विविध मार्गांनी मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद अशा मोठ्या शहरांमध्ये अंमली पदार्थांचा साठा पोहोचवला जातो. त्यामुळे फुगे विकणार्‍यांपासून ते पार्ट्यांमध्ये फुग्यांचे डेकोरेशन करणार्‍यांपर्यंत सगळ्यांवर पोलिसांची बारीक नजर आहे. तर दुसरीकडे पोलिसांना चकवा देऊन पार्टीमध्ये ड्रग्ज पोहोचवण्यासाठी खास कोडवर्ड तयार करण्यात आले आहेत.

ख्रिसमस आणि नव्या वर्षाचे स्वागत आणखी जल्लोषी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 24 डिसेंबर, 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर या तीन रात्री शहरातील बार पहाटे पाचपर्यंत उघडे ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे. गृह विभागाने उत्पादनशुल्काशी सल्ला मसलत करुन हा निर्णय घेतला आहे.  इतर वेळी वेळेची ही मर्यादा रात्री 1.30 पर्यंत असते. या तिन्ही रात्रींना दारुची दुकाने 1 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यासही परवानगी देण्यात आली आहे. सामान्यपणे दारु दुकाने रात्री 10.30 वाजता बंद होतात. 

नववर्षाचे स्वागत करताना प्रत्येकालाच चांगले क्षण हवे असतात. त्यामुळेच वेळेच्या मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटनाचे ठिकाण म्हणून मुंबईचा या निमित्ताने प्रचार होईल, असे एका अधिकार्‍याने सांगितले. या तिन्ही रात्रींना अतिरीक्त बंदोबस्त तैनात करण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली आहे. 
स गृहविभागाने यासंबंधीची सूचना प्रसारित केलेली असली तरी बार आणि पबचालकांना मात्र पोलिसांकडून तसे निर्देेश मिळालेले नाहीत. बार आणि पब मालकांनी वेळेत शिथिलतेसाठी पोलीस महासंचालक सतीश माथूर यांना पत्र पाठविले आहे.