होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पदवीधर, शिक्षक संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचा मित्र पक्षांना पाठींबा

पदवीधर, शिक्षक संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचा मित्र पक्षांना पाठींबा

Published On: Jun 06 2018 4:24PM | Last Updated: Jun 06 2018 4:24PMमुंबई : प्रतिनिधी

विधान परिषदेवर पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून निवडून द्यावयाच्या चार जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत  उमेदवार उभा न करण्याचा निर्णय काँगेसने घेतला आहे. स्वतंत्र उमेदवार उभा करून शिवसेना-भाजपा विरोधातील मतदानात फूट पाडण्याऐवजी मित्र पक्षांच्या उमेदवारांना काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे.

मुंबई शिक्षक मतदार संघात कपिल पाटील लोकतांत्रिक जनता दल (शरद यादव गट), मुंबई पदवीधर ऍड. राजेंद्र कोरडे शेतकरी कामगार पक्ष, कोकण पदवीधर नजीब मुल्ला, राष्ट्रवादी काँगेस पक्ष तर नाशिक शिक्षक संदीप बेडसे, महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) या मित्र पक्षांच्या उमेदवारांना 25 जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी पाठिंबा देण्यात येत असल्याचे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी जाहीर केले आहे.