Mon, Nov 19, 2018 23:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कमला मिल्स आग : आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली

...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली

Published On: Dec 29 2017 1:50PM | Last Updated: Dec 29 2017 1:50PM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील लोअर परेलमधील कमला मिल्स कम्पाऊंडमधील भीषण आगीने मुंबईकर हादरले आहेत. गुरुवारी रात्री साडेबारा वाजता  लागलेल्या या आगीत १५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २२ वर्षीय यशा ठक्कर नावाच्या तरुणीचा समावेश आहे. 

वाचा : बारा वाजता केक कापला, साडेबारा वाजता अंत झाला 

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी यशा गुजरातहून मुंबईला आली होती. थर्टी फर्स्ट डिसेंबरसाठी तिची तयारी सुरु होती. ती पहिल्यांदाच नव्या वर्षाचं स्वागत मुंबईत करणार होती. त्यामुळे ती फारच उत्साहात होती. यशा गुरुवारी (28 डिसेंबर) रात्री चुलत भाऊ आणि बहिणीसोबत कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेल मोजोज रेस्टॉरंट अॅण्ड पबमध्ये जेवायला गेले होती. काही वेळात आपल्‍यासोबत काय होणार याची तिला जराही कल्ना नव्हती. यशा जेवण करत असतानाच हॉटेलला आग लागली. पाहता पाहता ही आग संपूर्ण हॉटेलमध्ये पसरली.

आग लागल्यानंतर चुलत बहिण जीव वाचवण्यासाठी वॉशरुममध्ये गेल्याने ती बचावली. पण यशा आगीच्या कचाट्यात सापडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यशाचे आई-वडील गुजरातहून मुंबईत दाखल झाले आहेत.