Thu, May 23, 2019 05:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई: जोगेश्वरीतील २६ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

मुंबई: जोगेश्वरीतील २६ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

Published On: Dec 13 2017 7:57PM | Last Updated: Dec 13 2017 7:57PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

जोगेश्वरी बालविकास विद्या मंदिर (मराठी मीडियम) शाळेच्या २६ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्‍या सर्व मुलांना जवळच्याच कोकण रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलांवर तातडीने उपचार करण्यात आले असून, सर्व मुलांची प्रकृती ठिक असल्‍याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. 

जोगेश्वरीतील सर्वोदय नगर येथे ही शाळा असून, मध्यान्न भोजन म्हणून देण्यात आलेली खिचडी खाल्ल्यानंतर पाचवी आणि सातवीतील मुलांना पोटदुखी, चक्कर येणे, पोटात जळजळणे असा त्रास सुरू झाला. काही मुलांनी उलट्याही केल्या.  शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी तात्‍काळ सर्व मुलांना जवळच्याच कोकण रूग्‍णालयात दाखल केले.