Thu, Jan 17, 2019 16:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इंटरनेट फुकट देता, तसं रेशनही फुकट द्या : उद्धव ठाकरे

इंटरनेट फुकट देता, तसं रेशनही फुकट द्या : उद्धव ठाकरे

Published On: Aug 25 2018 4:55PM | Last Updated: Aug 25 2018 10:08PMमुंबई : प्रतिनिधी

डिजिटल इंडियात इंटरनेट फुकट मिळत आहे, त्यामुळे केबलही फुकट देण्याच्या घोषणा होत आहेत. यातून प्रेरणा घेऊन जस केबल, इंटरनेट फुकट देतात, तस रेशन आणि पेट्रोल-डिझेलही फुकट द्या, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला लगावला आहे. 

जिओ कंपनीच्या केबल व इंटरनेट सेवेमुळे या क्षेत्रातील व्यावसायिकांचा रोजगार हिरावला जात आहे. सुरुवातीला सेवा फुकट देऊन नंतर त्यावर चार्जेस आकारले जातात, ही फसवणूक आहे. या क्षेत्रातील  व्यवसायीकांवर अन्याय होऊ देणार नाही. नुसत्या डिजिटल इंडियाने लोकांच पोट  भरणार नाही, या विरोधात लढायची वेळ आली तर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी केबल व इंटरनेट चालकांच्या मेळाव्यात दिला.