Sat, Nov 17, 2018 02:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हार्बर रेल्वेची वाहतूक विस्‍कळीत, ओव्हरहेड वायर तुटली

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्‍कळीत, ओव्हरहेड वायर तुटली

Published On: Mar 01 2018 8:32AM | Last Updated: Mar 01 2018 8:32AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

हार्बर रेल्वेवरील अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. गुरूवारी सकाळी सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान हा प्रकार घडला. ऐन सकाळी वाहतूक ठप्प झाल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. 

वडाळा आणि कॉटनग्रीन स्थानकादरम्यान असलेल्या शिवडी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे वाहतून ठप्प झाली. अंधेरी-वडाळा आणि वडाळा-पनवेल या मार्गावरील वाहतून सुरु झाली असून, आव्हरहेड वायर दुरुस्‍तीचे काम सुरु आहे.

रेल्‍वे स्‍थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. प्रवाशांच्या सोईसाठी अतिरीक्‍त बेस्‍ट बसेसची सोय करण्यात आली आहे.