Thu, Jan 24, 2019 16:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वेग कमी केल्यामुळे हार्बरचे प्रवासी त्रस्त

वेग कमी केल्यामुळे हार्बरचे प्रवासी त्रस्त

Published On: Apr 09 2018 12:34PM | Last Updated: Apr 09 2018 12:34PMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते पनवेल या हार्बर रेल्वे मार्गाची गती वाढविणार असल्याचे रेल्वेने मागील आठवड्यात घोषित केले होते. प्रत्यक्षात मात्र या मार्गावरील गाड्यांची गती कमी केल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. 

वेगाने विकसीत होणारे पनवेल शहर आणि नवी मुंबईत राहणारे शेकडो प्रवासी या मार्गावरून प्रवास करत असतात. या दोन्ही शहरवासियांचा विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज टॅमिनल, कुर्ला आणि आता गोरेगावपर्यंत प्रवास असतो. सीएसटी पर्यंतच्या प्रवासासाठी १ तास १५ मिनिटे कालावधी लागत आहे. रेल्वेच्या  पश्चिम आणि मुख्य मार्गावर जलद गाड्या धावत असल्यामुळे हर्बरवरसुद्धा जलद गाड्या सुरू कराव्यात अशी प्रवाश्यांची मागणी आहे. परंतु तांत्रिक कारण सांगून रेल्वे प्रशासन गेल्या अनेक वर्षांपासून चाल ढकल करत आहे.

 रेल्वे रूळ आणि तांत्रिक बदल केल्यामुळे आता सीएसटीला लागणारा वेळ कमी होईल, प्रवाशांचे १५ मिनिट वाचतील, असे सांगण्यात आले. परंतु रेल्वेने प्रत्यक्षात प्रवाशांची दिशाभूल केली आहे. सीएसटी व पनवेलवरून सुटलेल्या गाडीचा वेग कमी करण्यात आला आहे. गाड्या संथ चालविल्या जात असल्यामुळे नियोजित वेळेपेक्षा गाड्या १५ते २० निटे उशिराने धावत आहेत.