Thu, Aug 22, 2019 14:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड, प्रवाशांची गर्दी 

हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड, प्रवाशांची गर्दी 

Published On: Apr 24 2019 9:03AM | Last Updated: Apr 24 2019 9:03AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

मानखुर्द येथे लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफला ओव्हरहेड वायर अडकल्यामुळे तांत्रिक बिघाड झाला आहे. त्‍यामुळे सकाळपासून पनवेलकडे जाणारी वाहतूक बंद पडली. या प्रकारामुळे प्रवाशांतून संताप व्‍यक्‍त केला जात आहे. स्‍थानकावर प्रवाशांची गर्दी झालेली दिसून येत आहे. 

जवळपास दीड तास वाहतूक खोळंबली. त्‍यामुळे हार्बर मार्गावरील स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. सकाळपासून पनवेलकडे जाणारी वाहतूक बंद पडली. साधारणतः दीड तास लोकल सेवा बाधीत झाली.  सीएसएमटीच्‍या दिशेने जाणार्‍या काही लोकल ट्रेनही रद्‍द झाल्‍या. आता रेल्‍वेचे पथक स्‍थानकावर पोहोचले असून दुरुस्‍तीचे काम सुरू आहे. परंतु, सकाळच्‍या वेळी कामावर जाणार्‍या नागरिकांना मनस्‍ताप सहन करावा लागला.