Tue, May 21, 2019 00:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीने दिला मुलाला जन्म; मुलगी दहशतीखाली

बलात्कार पीडित १४वर्षीय मुलीने दिला मुलाला जन्म

Published On: Dec 30 2017 1:47AM | Last Updated: Dec 30 2017 1:47AM

बुकमार्क करा
मुंबई : अवधूत खराडे

भांडुपमध्ये राहात असलेल्या अवघ्या 14 वर्षीय मुलीवर एका अज्ञाताने बलात्कार केला. मुलगी गर्भवती राहिली, परंतु समाजात नाचक्की होईल म्हणून आईवडील गप्प बसले. तिने एका मुलाला जन्म दिला आणि हे प्रकरण उघडकीस आले. घटनेच्या त्या दिवसापासून मुलगी प्रचंड दहशतीखाली असून भीतीपोटी काहीच बोलत नाही. अखेर एका महिला सहायक पोलीस निरीक्षकाने याप्रकरणी फिर्याद दाखल करत अज्ञाताविरोधात बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

भांडुप पश्‍चिम परिसरात कुटूंबासोबत राहात असलेल्या या पिडीत मुलीला एका नराधमाने मे महिन्यामध्ये एकटे गाठून धमकावत तिच्यावर पाशवी बलात्कार केला. घडल्या प्रकारामुळे मुलगी प्रचंड घाबरली होती. मुलीने घराबाहेर पडणे बंद केल्यानंतर आई-वडिलांना तिच्याकडे विचारणा केली असता झालेल्या अत्याचारांना तीने वाचा फोडली. समजात नाचक्की होईल म्हणून आई-वडील गप्प बसले होते. मुलगी गर्भवती असल्याने तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. तीने एका मृत मुलाला जन्म दिल्याचे समजताच पोलिसांनी रुग्णालयात जाऊन संबंधित घटनेची दखल घेतली.