Mon, Jun 01, 2020 01:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत बाप्पा मोरयाचा जयघोष

मुंबईत बाप्पा मोरयाचा जयघोष

Published On: Sep 12 2019 9:41AM | Last Updated: Sep 12 2019 10:04PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन  

आज अनंत चतुर्दशीला आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. मनोभावे पूजा केल्यानंतर गणरायाचे आज गुरुवारी विसर्जन होत आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली आहे. भक्तांसह गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. 

बाप्पाच्या निरोपासाठी राज्यभरात जय्यत तयारी सुरू आहे. विसर्जनासाठी मुंबईतील चौपाट्या, तलाव, कृत्रिम तलाव येथे मोठी गर्दी उसळत आहे. मुंबईतील गणेश गल्लीचा राजा, लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे.  

विसर्जन सुरळीत होण्यासाठी पोलिस, महापालिकासह सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. एकूण ५३ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. 

लाईव्ह अपडेट - 

- मुंबई : गणेश मंडळांसह घरगुती गणपतीचेही विसर्जन 

- गणेशगल्लीतील प्रसिद्ध 'मुंबईच्या राजा'च्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

- विसर्जनासाठी मुंबईतील चौपाट्या, तलाव, कृत्रिम तलाव येथे मोठी गर्दी 

- चौपाट्यांवर सुरक्षा व्यवस्था तैनात  

- लालबागच्या राजाच्या आरतीली सुरूवात 

- गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष 

- १० दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर बाप्पांना आज निरोप   

- मुंबईत ५० हजारांची फौज तैनात 

- पालिकेच्यावतीने ३२ ठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था 

- ५३ रस्ते बंद  

- मुंबई - तेजुकाया मंडळाच्या बाप्पांची विसर्जन मिरवणूक सुरू 

- लालबाग - बाप्पांच्या स्वागतासाठी रस्त्यांवर आकर्षक रांगोळ्या  

- मुंबई - गिरगावच्या राजाची मिरवणूक सुरू 

- चिंचपोकळीचा राजा विसर्जन मिरवणूक सुरूवात 

काळाचौकीचा महागणपती 

कॉटनचा राजा 

गिरणी कामगारांचा राजा (घोडपदेव)

मुंबईचा राजा गणेश गल्ली गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीस सुरुवात

११ व्या दिवसी सुमारे २२१६८ गणेशमुर्तींचे विसर्जन 

सार्वजनिक मंडळ - १७००, घरगूती - २०२८४, गौरी- १८४, एकूण २२१६८ असे गणेशमुर्तींचे आज ११ व्या दिवशी विसर्जन करण्यात आले आहे. यातील कृत्रिम तलावांमध्ये सार्वजनिक मंडळांचे ४८, घरगूती २८४९, गौरी ०४ असे २९०१ गणेशमुर्तींचे विसर्जन झाले आहे. तर विसर्जना दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडलेली नसून तशी कोणतीच नोंद नसल्याचे डीएमयूच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.