Wed, Feb 20, 2019 02:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गुटखा विक्रेत्यांविरुध्द कारवाई,१५ लाखाचा साठा जप्त

गुटखा विक्रेत्यांविरुध्द कारवाई,१५ लाखाचा साठा जप्त

Published On: Jun 02 2018 4:22PM | Last Updated: Jun 02 2018 4:22PMमुंबई : प्रतिनिधी

बृहन्मुंबई येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा घालून प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू ,सुपारी असा सुमारे 15 लाख रुपये किमंतीचा साठा जप्त केला.

या छाप्‍यासाठी महाराष्ट्रातील इतर जिल्हयातील अधिकारी व बृहन्मुंबई विभागातील अधिकारी यांची संयुक्त 18 पथके तयार करण्यात आली होती. या पथकाकडून मुंबई शहरातील विविध भागात कारवाई करण्यात आली. या कारवाईत मुंबईतील प्रामुख्याने नळबाजार, डोंगरी, धारावी, साकीनाका, चेंबुर, कुर्ला, इ. या संवेदनशील क्षेत्राचा समावेश होता.  प्रतिबंधित अन्न पदार्थाची विक्री केल्यामुळे 81 दुकाने सिलबंद करुन 89 व्यक्तींविरुध्द कायदेशीर कारवाई आली. या कारवाईत सुमारे पंधरा लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा ताब्यात घेण्यात आला आहे.