Mon, May 20, 2019 08:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत विमानाचे लँडिंग ही कसरतच

मुंबईत विमानाचे लँडिंग ही कसरतच

Published On: Jan 06 2018 1:25AM | Last Updated: Jan 06 2018 1:04AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

विमानतळाच्या धावपट्टीभोवती निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीची अनेक बांधकामे असून सुरक्षित लँडिंग करताना वैमानिकाची कसरतच होत असते. विमान लँड झाल्यानंतर वैमानिकाचे आभार मानूनच विमानाबाहेर पडायला हवे, अशी सध्या परिस्थिती आहे, अशी चिंता व्यक्त करतानाच मुंबई उच्च न्यायालयाने धावपट्टीशेजारी निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीची अनेक बांधकामे झाल्याचा पुनरुच्चार केला.

विमानतळाच्या धावपट्टीशेजारी उभारण्यात आलेली एक भिंतही अतिशय धोकादायक असून त्यामुळे टेकऑफ करताना विमानांना धोका निर्माण होऊ शकतो, असा आरोप करणार्‍या आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने ही चिंता व्यक्त केली.

यावेळी या बचाव पक्षाने मात्र बांधकामाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. विमानाचे टेकऑफ होताना जेट इंजिनमधून निघणार्‍या शक्तिशाली थर्स्टपासून बचाव होण्यासाठी धावपट्टीशेजारी हे बांधकाम केल्याचा खुलासा कोर्टासमोर करण्यात आला.  मात्र याचिकाकर्ता गैरहजर राहिल्याने न्यायालयाने या याचिकेची सुनावणी स्थगिती ठेवली.