Sat, Apr 20, 2019 09:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत फरसाणा दुकानाला आग; १२ ठार

मुंबईत फरसाणा दुकानाला आग; १२ ठार (व्हिडिओ)

Published On: Dec 18 2017 10:22AM | Last Updated: Dec 18 2017 11:05AM

बुकमार्क करा

मुंबई  : प्रतिनिधी 

अंधेरीच्या साकीनाका परिसरात फरसाणाच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत बारा मजूरांचा होरपळून मृत्यू झाला. पोलीस आणि अग्नीशमन अधिकाऱ्यांनी आगीत अडकलेल्या सर्व जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. 

अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरच्या खैराणी रोड परिसरातील भानू फरसाण या दुकानाला पहाटे ४ वाजून १६ मिनीटांनी लागली. दुकान एक मजली होते. दुकानातील तळ मजल्यावर आग लागल्यानंतर खाली झोपलेले कर्मचारी जीव वाचवण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले.

दुकानातील आग पसरत होती. धूर आणि आग यांच्यामुळे पहिल्या मजल्यावर अडकलेले कर्मचारी बाहेर येऊ शकले नाहीत. दुकानातील मजूर आग आणि धूरामुळे अडकून बसले. त्यामुळे आगीत होरपळून १२ मजूरांचा मृत्यू झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगीच्या तीव्रतेमुळे पोटमाळा कोसळला. ज्यामुळे पोटमाळ्यावर अडकलेले सर्व कर्मचारी आगीत सापडले.

पोलीस आणि अग्नीशमन अधिकाऱ्यांनी आगीत अडकलेल्या सर्व मजूरांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. 

साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अविनाश धर्माधिकारी  म्हणाले, “आगीत १२ मजूरांचा होरपळून मृत्यू झालाय. आगीचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. भानू फरसाण या दुकानात पहाटेच्या सुमारास आग लागली.”