Wed, Jul 17, 2019 00:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अखेर मनसेच्या सहा नगरसेवकांचे शिवसेनेत पुनर्वसन

अखेर मनसेच्या सहा नगरसेवकांचे शिवसेनेत पुनर्वसन

Published On: Jan 25 2018 10:54PM | Last Updated: Jan 25 2018 10:56PMमुंबई  : प्रतिनिधी 

मनसेला धक्का देत शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा नगरसेवकांचे अखेर शिवसेनेत पुनर्वसन झाले. कोकण आयुक्तांनी रात्री सहा नगरसेवकांना शिवसेना गटात सामिल होण्यास मंजूरी दिली. तसे पत्र पालिका आयुक्तांना पाठवताच गुरूवारी रात्री उशीरा महापौर विश्र्वनाथ महाडेश्र्वर यांनी पालिका सभागृहात घोषणा केली.  त्यामुळे पालिकेतील ताकद वाढली आहे.

मनसेला जय महाराष्ट्र करत कुर्ल्याचे ज्येष्ठ नगरसेवक दिलीप लांडे यांच्यासह हर्षला मोरे, अर्चना भालेराव, दत्ता नरवणकर, परमेश्वर कदम व अश्र्वीनी माटेगावकर यांनी उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. पण या प्रवेशाला आक्षेप घेत मनसेने कोकण आयुक्तांकडे याचिका दाखल केली. गेल्या तीन महिन्यापासून या याचिकेवर सुनावणी सुरू होती. त्यामुळे मनसे नगरसेवकांचे पद धोक्यात होते. 

   अखेर कोकण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी गुरूवारी मनसे नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. या पत्राची प्रत पालिका आयुक्तांमार्फत रात्री उशीरा चिटणीस विभागाकडे येताच महापौर विश्र्वनाथ महाडेश्र्वर यांनी क्षणाचाही विलंब न लावता नगसेवकांच्या शिवसेना विलिनिकरणाची घोषणा केली.  त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेना नगरसेवकांचे संख्याबळ 88 वरून 93 झाले आहे.  त्यामुळे शिवसेनेचा पाठलाग करून सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपाचे संख्याबळ 85 वर अडकले आहे.
पालिकेतील नगरसेवक संख्याबळ 

शिवसेना - 90 व अपक्ष - 3 - 93
भाजपा - 84 व अपक्ष- 1 - 85र्
काँग्रेस - 30
राष्ट्रवादी काँग्रेस - 9
मनसे - 1