Sat, Aug 24, 2019 00:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › २० कोटींच्या लाचेची मागणी, जिल्‍हा परिषद सदस्‍याला अटक

२० कोटींच्या लाचेची मागणी, जिल्‍हा परिषद सदस्‍याला अटक

Published On: Mar 15 2018 4:40PM | Last Updated: Mar 15 2018 4:40PMमुंबई : प्रतिनिधी

पवईतील एका नामांकित विकासकाला २० कोटी रूपयांची खंडणी मागणाऱ्या पुणे जिल्हा परिषद सदस्याला पवई पोलिसांनी अटक केली.

या जिल्‍हा परिषद सदस्याने एका विकासकाकडे २० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. यातील २ कोटी रुपयांची रक्कम तो स्विकारत असताना त्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या खंडणीखोर सदस्याला अटक कारण्यात आली असून, तो जुन्नर, पुणे येथे जिल्हा परिषद सदस्य असल्याचे समोर आले आहे. पवई पोलिसांनी भादवि कलम ३८४ नुसार गुन्हा नोंद करून या आरोपीला अटक केली आहे.