होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांची मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा

चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांची मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा

Published On: Jan 06 2018 1:25AM | Last Updated: Jan 06 2018 12:58AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

भीमा कोरेगांव प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केली होती. त्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्तीं विजया तहिलरामाणी यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली व या चौकशीसाठी परवानगी मागितली. त्याचप्रमाणे त्याकरिता न्यायमुर्तींचे नाव सुचविण्याची विनंतीही केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

भीमा कोरेगांव येथे घडलेल्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले  होते. दंगलीत मोठे नुकसानही झाले याप्रकरणी त्या त्या जिल्ह्यात पोलिस चौकशी करत असुन धरपकडीचे सत्र राज्यभर सुरू आहे. 
याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी ही चौकशी तात्काळ विद्यमान न्यायमुर्तींमार्फत केली जाईल, अशी घोषणा केली होती. 

गेल्या दोन चार दिवसात राज्यात घडलेल्या घटना पहाता तातडीने या चौकशीचे काम सुरू व्हावे व राज्यातील वातावरण शांत व्हावे, असा सरकारचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून केलेल्या चौकशीच्या घोषणेनुसार मुख्यमंत्र्यांनी ही भेट घेतल्याचे सुत्रांकडून  सांगण्यात आले.