मुंबई : पुढारी ऑनलाईन
नाशिकहून निघालेल्या किसान सभेच्या शेतकर्यांच्या लाँग मार्चला मुंबईच्या डबेवाल्यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. शेतकर्यांच्या लाँग मार्चचा आजचा सातवा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे शेतकर्याच्या या निघालेल्या मोर्चाला मुंबई डबेवाला असोशिएशनने आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
भाजप सरकारने शेतकर्यांच्या मागण्या मान्य करून शेतकर्यांच्याग पाठिशी रहावे असे आवाहनही डबेवाल्यांनी केले आहे. सात दिवस चाललेल्या या लाँग मार्चमुळे अनेकजण जखमी झाले आहेत, आजारी आहेत. या परिस्थितीही शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. मागण्यांसाठी मुंबईत येऊन पायपीट करणार्या या शेतकर्यांसाठी मुंबईचे डबेवाले धावले आहेत. मोर्चातील सार्या लोकांना अन्न देणे शक्य नसले तरी लाँग मार्चमधील काही शेतकर्यांना आज मुंबई डबेवाल्यांच्या रोटी बँकेतर्फे अन्न वाटप करण्यात येणार आहे.