Sun, Jul 21, 2019 08:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चिंतामणीच्या आगमनात भाविकांची गर्दी, पोलिसांचा लाठीचार्ज(Video)  

चिंतामणीच्या आगमनात भाविकांची गर्दी, पोलिसांचा लाठीचार्ज(Video)  

Published On: Sep 08 2018 4:48PM | Last Updated: Sep 08 2018 4:50PMमुंबई : प्रतिनिधी

चिंचपोकळीच्या चिंतामणी  गणपतीचा आगमन सोहळा सुरू आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या या आगमन सोहळ्यात मुंबईकरांची मोठी गर्दी झाली आहे. विशेषत: या मिरवणुकीत तरुण मोठ्‍या संख्येने सहभागी झाले आहेत. मूर्तीकार रेश्मा खातू यांच्या गणेश चित्र शाळेतून आज शनिवारी दुपारी  चिंचपोकळीच्या चिंतामणीची आगमन मिरवणूक सुरू झाली. आपल्‍या लाडक्‍या गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी सौम्‍य लाठीमार केला आहे, तर या गर्दीत झालेल्‍या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले आहेत.

चिंतामणी गणपतीचे हे 99 वे वर्ष आहे. चिंतामणीच्या आगमनात तरूणाईच्या जल्लोषाला उधाण आले आहे. गणरायाच्या आगमन सोहळ्यामुळे रस्‍त्‍यावर भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. यामुळे वाहतूककोंडी झाली असून, संपूर्ण बी. ए. मार्ग, ग. द. आंबेकर मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहनांची गर्दी कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ढोल ताशांचा गजर आणि त्यावर गणेश भक्तांनी धरलेला ताल यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडाली आहे. उत्साही कार्यकर्ते आणि भाविक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने काही ठिकाणी पोलिसांना सौम्या लाठीचार्जही करावा लागला. यावेळी झालेल्‍या चेंगराचेंगरीच्या प्रकारात काहीजण जखमी झाले आहेत.