Sat, Nov 17, 2018 20:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई: बीपीसीएल रिफायनरी कंपनीमध्ये स्‍फोट, २१ जखमी, एक गंभीर

मुंबई: बीपीसीएल रिफायनरी कंपनीमध्ये स्‍फोट, २१ जखमी, एक गंभीर

Published On: Aug 08 2018 4:02PM | Last Updated: Aug 08 2018 6:08PMमुंबई :  प्रतिनिधी 

मुंबईतील चेंबूर माहुल परिसरातील बीपीसीएल रिफायनरी कंपनीच्या प्लांट मध्ये जोरदार स्फोट होऊन आग लागली आहे. या आगीत काही कामगार अडकल्‍याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

दुपारी साधरनपणे 1 वाजून 45 मिनिटांनी हा स्फोट झाला असून, मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ दूरपर्यंत दिसून येत आहेत. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली असून, घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाचे 7 फायर इंजिन, 2 फोम टेंडर आणि 2 जंबो टँकर सह जवान करीत आहेत. अग्‍निशमन दलाच्या जवांनांकडून आगीत अडकलेल्‍या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत. 

बीपीसीएल कंपनीच्या हायड्रो क्रॅकर युनिटमध्ये हा स्‍फोट झाला असून, या आगीत २९ कर्मचारी जखमी झाल्‍याचे समजत आहे. तर एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. दरम्‍यान अग्‍निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत. अग्‍निशमनला आगीवर ७० टक्‍के नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.