Mon, Mar 25, 2019 09:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘चला हवा येऊ द्या’ मधील पत्रे पुस्तकरूपाने

‘चला हवा येऊ द्या’ मधील पत्रे पुस्तकरूपाने

Published On: Dec 30 2017 1:47AM | Last Updated: Dec 30 2017 1:47AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

चला हवा येऊ द्या या छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय विनोदी कार्यक्रमात एक गंभीर सदर सादर केले जाते ज्यात सामाजिक समस्येवर आधारित एक पत्र एक पोस्टमनकाका वाचून दाखवतात. विनोदी कार्यक्रमातील हे वास्तववादी गंभीर मजकूर असलेली पत्र प्रेक्षकांना खूप आवडते. त्यामुळेच अशी बरीच पत्रे या कार्यक्रमाचा भाग बनली. झी मराठीने ही सर्व पत्रे एकत्र करून पुस्तकरूपात आणण्याच्या प्रयत्नांना यश आले असून पत्रास कारण की ..... या पुस्तकाचे नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले.

25 डिसेंबर 2017 वाचकदीनी अरविंद जगताप लिखित मपत्रास कारण की... पुस्तकाचा प्रकाशन समारंभास डॉ. निलेश साबळे, सयाजी शिंदे, संजय जाधव, हेमलता अंतरकर, रमेश भाटकर, गणपतराव जगताप, सुदेश हिंगलासपूरकर, किरण येले इ. मान्यवर मंडळी उपस्थित होती. अरविंद जगताप यांची पत्रलेखन ही खाजगी गोष्ट चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून सर्वांची झाली आणि आता ग्रंथाली मुळे पुस्तकरूपाने आली याबद्दल आनंद व्यक्त केला. 

यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांपैकी काहींनी अरविंद जगताप यांच्याबद्दलच्या काही आठवणी ताज्या केल्या. हिंदीमध्ये शेतकर्‍यांबद्दलचे पत्र काव्यात्मक भाषेत अरविंद जगताप यांनी लिहिले होते. अनुपम खेर यांना ते प्रचंड आवडले होते. व त्यांनी जगताप यांची फोनवरून परवानगी घेत संसदेत वाचून दाखवले होते. ते पत्र वाचून माझ्याही डोळ्यांत अश्रू आले होते अशी आठवण निलेश साबळे यांनी सांगितली. 

पत्र ही जिवाभावाची गोष्ट असायची आणि अरविंदने आता पत्रांची जबाबदारी घेतली आहे. आजपर्यंतच्या निरनिराळ्या सिनेमांमधील त्याचे लिखाण खूपच अप्रतिम आहे, याचा मला अनुभवही आहे, अशी भावना सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली. एक लेखक, कवी म्हणून त्यांची लोकांमध्ये ओळख आहेच. पण एक माणूस म्हणून कसे असावे हे मी त्यांच्याकडून शिकत आलो आहे, अशी आठवण दिग्दर्शक संजय जाधव यांनी सांगितली.