Tue, Apr 23, 2019 07:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › छगन भुजबळांच्या प्रकृतीची  सभागृहात चिंता

छगन भुजबळांच्या प्रकृतीची  सभागृहात चिंता

Published On: Mar 05 2018 4:26PM | Last Updated: Mar 05 2018 4:26PMमुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृती बद्दल आज विधानपरिषदेत चिंता व्यक्त करण्यात आली. जे जे रूग्णालयात त्यांना योग्य उपचार मिळत नाहीत. त्यांना खाजगी रूग्णालयात उपचार करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे विधानपरिषदेत केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी त्यास सहमती दर्शवली.

भुजबळ आताही आमदार आहेत.जे जे रुग्णालयात तपासणीसाठी गेल्यावर त्यांना ओपीडीच्या रांगेत उभे रहावे लागते.अँजिओग्राफी,ईसीजी अबनॉर्मल आले तरी डॉक्टर त्यांना जेलमध्ये पाठवा म्हणतात. न्यायदानात जे होईल ते होईल पण प्रशासन असे का करत आहे असा प्रश्न त्‍यांनी केला. 

कपिल पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित करत छगन भुजबळ यांची प्रकृती हा काळजीचा विषय असल्याचं सांगत आरोप सिद्ध झालेले नसतानाही त्यांना गुन्हेगाराची वागणूक दिली जाते असं सांगितलं. 
सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी मनात अढी ठेवून काम करणारं हे सरकार नाही. या विषयासंदर्भात कायद्याच्या चौकटीत राहून योग्य तो निर्णय घेतला अस सांगितलं. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी  भुजबळ यांना खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात येईल का याविषयी न्यायालयाला सरकार आणि संबंधित तपास संस्थांनी विचारणा करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी सूचना केली.