होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हजारोंचे  प्राण वाचविणाऱ्या मोटरमनचा मरेकडून सन्मान        

हजारोंचे  प्राण वाचविणाऱ्या मोटरमनचा मरेकडून सन्मान        

Published On: Dec 04 2017 5:48PM | Last Updated: Dec 04 2017 5:48PM

बुकमार्क करा

                                                                       
  मुंबई : प्रतिनिधी 

मोटरमन अनुराग शुक्ला यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे हार्बर मार्गावर मोठा अपघात टळला आणि हजारोंचे जीव वाचले. अनुराग शुक्ला यांच्या या कामगिरीबद्दल मध्य रेल्वे प्रशासनाकडून त्यांना गौरवण्यात आले आहे.

सोमवारी सकाळी 7:30 वाजता मस्जिद स्थानकाजवळ मोटरमन शुक्ला यांना रुळावर काहीतरी असल्याचे लांबूनच दिसले, त्यानंतर त्यांनी तत्परतेने गाडी थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती त्यांनी स्टेशन मास्तर, पोलिसांना दिली. त्यांच्या या कामगिरीमुळे प्रवाशांचा रेल्वे प्रशासनावरील विश्वास वाढवला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचे डीआरएम एस.के. जैन यांनी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला.